K.E.M. Radiology

Patients First!


Welcome to the Academic and Educational pages  of the

Department of Radiology 

  Seth G.S. Medical College and K.E.M. Hospital, Mumbai , India


Poems 

Malini Nadkarni

Former Chief of Radiology

टाटा रुग्णालयांत मी माझ्या इंटर्नशिप पासून या ना त्या निमित्ताने एक डॉक्टर म्हणून जात असते. २६ ऑगस्टला पेशंटसोबत म्हणून गेले होते. तेव्हां मला वाटलं तें..... 

टाटा रुग्णालयास समर्पित 

वेदनेच्या अथांग सागरांत अनेक चेहरे पोहत होते.

 वेदनेच्या अथांग सागरांत अनेक चेहरे पाहत  होते.

 कधी बनून छोटी नाव इकडे तिकडे गेलेहोते.

 कधी बनून दीपस्तंभ चुकलेली वाट दाखवत होते.  

 

 आज मात्र झाला माझा एकच स्तब्ध उभा खांब

 

हात पाय डोकं पोट ,मध्येच हलतात सुकलेले ओठ ,

चादरीमागे एक नाक दोन कान, मध्येच असते वाकडी मान

नाही गोंधळ, नाही घाण , आशा इच्छा यांचंच रान

रस्ते, जिने, दिशा, पाट्या , त्यांतून फिरते वेडी आशा

रिकामा कोपरा दिसत नाही, माणसांची रीघ संपत नाहीं

 

कष्टकऱ्यांचे दमतात हात, अफाट पसारा अन अचाट काम,

शिकलेल्या अन शिकणाऱ्यांना, नसतो इथे कधी आराम

कोणी नाही दुर्मुखलेला कोणी नाही थकलेला

माणुसकीचा गहिवर मोठा , नाव तयाचे  या वास्तूला

 

 इथे उभी राहून आज, भूत-भविष्य समजून घेते .

सारे पुतळे खुजे ठरतील अशी तुझी उंची भासते.

 

डॉ. मालिनी नाडकर्णी             

----------------------------------- 






-----------------------------------

धमन्यांचं गाणं अर्थात     Song of blood vessels......


हसत खेळत धावत धावत

चालल्या होत्या सर्वजणी l

खाऊ वाटणं मुख्य काम,

त्याचबरोबर सफाई काम।

 प्राणवायु,ॲन्टीबाॅडीज सगळ्यांसाठी वाटूया,

बदलीमध्ये CO2, संगे

घेऊन जाऊया ।।

इकडून तिकडून, जिकडे तिकडे

वाटा असती चोहीकडे

एकच आस,एकच ध्यास

सर्व पेशींना मिळतोय घास

सगळ्या पेशी आपल्याच आहेत,

त्यांची पोटं भरली पाहिजेत ।

पण

मध्येंच आला ठोंब्या थ्राॅम्बस !

वाट अडवून उभा राही

कोणा पुढे जाऊ न देई।

धडपडल्या त्या अडल्या पेशी

विचारात त्या अडकून जाती,

पुढच्यांना मग मिळेल काय?

त्यांचं त्यांत भागेल काय?

प्रश्नांची माला संपत नाही

पुढची वाट दिसत नाही।

इकडून तिकडे धावाधाव

मिळेल जिथे थोडा वाव,

घुसून पुढे जाऊया,

पेशींची सोय पाहूया ।।

कोलॅटरल्सचा फुटला पान्हा,

जणू पावा वाजवी कान्हा। 

धावून आला मदतीला,

पुढच्यांची सोय करायला।।

सर्जनला मग सुचली युक्ती, 

बायपासची करुन नियुक्ती।।

ठोंब्याला मग चकवा देऊनी,

बिकट वाट तर सोपी केली !

धन्यवाद सर्वांना सांगून,

धन्वन्तरीने ग्लोव्हज काढले।।

नवशास्त्राने त्याच्यानंतर,

ठोंब्याला हळू बाजू सारून,

प्रवाह पहिला पुन्हा आणला,

अँजिओप्लास्टी नांव तयाला।।


डाॅ.मालिनी नाडकर्णी 

18 Nov.2023.


-----------------------------------

हृदयाचं गाणं  (CVTC ला  समर्पित)

हृदय चाललंय झोकांत ,हृदय बोलतंय ठोक्यांत

त्याचं काही बिनसतंय ,कुरबुर करायला लागतंय I

कधी बालपणी ,कधी नंतर , बघायला हवंच तर

त्याचा काही नेम नाही, ठोका सहसा चुकत नाही i

कधी कधी तो पुटपुटतो , (Fibrilllation )

कधी तरी तो धडधडतो , ( Tachycardia )

कधी त्याला माज चढतो  (Hypertrophy )

आणि मग  तो गडबडतो ,  ( Irregularity )

मदतीला मग येती  मशिनी

ईसिजी ची तर मैत्री पहिली ,

डी -फ्रीब नंतर मागून आली

प्रथम बसवला पेसमेकर

सुकर झाला  रस्ता नंतर

हृदयाची तर सर्व दालने

तपासून मग सारी बघणे  (cardiac  Catheterization )

रक्तवाहिन्या नीला  रोहिणी

त्यांची होई योग्य चाचणी

त्यांना परखू निरखून घेऊ

दोष न कुठला मागे ठेवू

कामांची मग होई गर्दी ,

नवीन वास्तू समोर झाली

माय माऊली केईएम अपुली

 CVTC रुपे समोर आली.

 

Dr. Malini Nadkarni. 

24 -04 -2024

-----------------------------------

ॲन्टीबाॅडीज

[4/6, 14:28] Malini Nadkarni: One of my old poems:


I have come here away from those lovely days,

But the fragrance of those blooming flowers is still there to stay.

Anatomy is the same then and now.

It is for us to fix it somehow.

Bleeders,bumps, and blocks, anything one can get.

Time was important to do our best.

Polythene tubing and guide wires were all our treasures,

Gelfoam and blood clots were truly our measures!

It was for us to attempt our best,

Spare no time and do not be late.

Patient remained the centre-point, whatever we could get,

HE helped us to decide to put our efforts to test.

Smiles on the faces and feelings in the heart 

Remain same forever even if time apart !

-----------------------------------

नवीन  पर्व 

नवीन पर्व अवतरलंय

जुनं सर्व हरवलंय 

 

ओळखी पालखी नाती गोती

सुटत चालल्या ह्या निरगाठी

माझ्या घरचं कालवण

आणि तिच्या घरचं लोणचं

केव्हांच बंद पडलंय

कोणी ना कोणाच्या घरचं

चाली ब्लॉक्स बंद झाले,

 इमारतींनी आकाश पेललें

कोण कुणाचा कोणी नाही,

जो तो आपुल्यापुरतें पाहीं

 

तरीसुद्धा आपुलकीनें

त्याच्यावरती मात केली

मोबाईलची मधुमोहिनी

सप्तसागरपार गेली

आप्तसोयरे दिसू लागले,

 दिक्कालाचे बंधन तुटले

काय म्हणावे नवजगताला ,

 मला सुचेना, सुचे तुम्हांला  ?

 

डॉ. मालिनी नाडकर्णी

११ जुलै ,२०२३.

-----------------------------------

I sailed in a boat

I sailed in a boat, with ocean of thoughts,

Cells of my body said, “Fear you not”!

I did not sell self, I did not harm self,

In that darkness, I found some cells for my help.

I could see things well, I could feel them well

I swam through that ocean, with light in my head

There may be darkness, there may be light

Do not get frightened and lose your sight.

Dr. Malini Nadkarni

 

25 -12 -2023.


नवीन पर्व

नवीन पर्व  अवतरलंय , जुनं सर्व हरवलंय

ओळखी पाळखी ,नातीगोती ; सुटत चालल्या ह्या निरगाठी

माझ्या  घरचं कालवण ,आणि तिच्या घरचं लोणचं

केव्हांच बंद पडलंय ,कोणी ना कुणाच्या घरचं l

चाळीं ,ब्लॉक्स बंद झाले , इमारतींनी आकाश पेलले

कोण कुणाच्या घरचं नाहीं ,जो तो आपुल्यापुरतं पाहीं  l

 

तरीसूध्दा आपुलकीने त्याच्यावरती मात केली

मोबाईलची मधुमोहिनी सप्तसागरपार गेली  l

आप्तसोयरे दिसू लागलें , दिक्कालाचे बंधन तुटले

काय म्हणावे नवजगताला , मला सुचेना,सुचे तुम्हांला ?

 

Dr. Malini Nadkarni.

July  11, 2023. (When I received a video call from my sister in law who has shifted to U.S. where her children are settled.)

-----------------------------------